आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्‍या 'इंजिना'ची बदलली दिशा, डावीकडून उजवीकडे धावणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनची धावण्याची दिशा बदलण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने चिन्‍हाची दिशा बदलण्‍याची विनंती मान्‍य केली असून आता मनसेचे इंजिन डावीकडून उजवीकडे धावणार आहे. ते कागदावर अधिक ठळकपणे दिसावे म्हणून आकारात आणि छपाईतही बदल करण्यात आला आहे.
मनसेने काही दिवसांपूर्वी इंजिनाची दिशा बदलण्‍यासाठी तसेच चिन्‍हामध्‍ये किरकोळ बदल करण्‍यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने दिलेले निवडणूक चिन्ह मतदारांना लवकर ओळखता येत नाही. ते इंजिन नव्हे तर रोडरोलर आहे असा भास होतो. त्‍यात काही बदल करण्‍यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मनसेने केली होती. आयोगाने ही विनंती मान्‍य केली आहे. निवडणूक आयोगाने मनसेच्या निवडणूक चिन्हात काही ठळक बदल केले आहेत. मनसेचे रेल्वे इंजिन आशी उजवीकडून डावीकडे धावत असल्याचे चित्रात दिसत होते. आता ते डावीकडून उजवीकडे धावत असल्‍याचे दिसणार आहे. तसेच ते कागदावर ठळकपणे दिसावे म्हणून त्याच्या आकारात आणि छपाईत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. काहीसा गडद काळा रंग वापरण्‍यात आला आहे. तसेच ते रेल्‍वे इंजिन असल्‍याचे स्‍पष्‍टपणे लक्षात येण्‍यासाठीही काही किरकोळ बदल करण्‍यात आले आहे.