आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सेना-मनसेचीही पातळी घसरली; अजित पवारांच्या पोस्टरवर केली लघुशंका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. परंतु पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या मनसेच्या आंदोलनाने मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. दादर येथे सुरु असलेल्या आंदोलनात एका शाळकरी विद्यार्थ्याकडून अजित पवारांच्या पोस्टरवर लघुशंका करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर याबाबतीत शिवसेना काही मागे नाही. औरंगाबादमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला मूत्र पाजले आहे.

इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे एका जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी खालच्या पातळीवर उतरत दुष्काळ आणि दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली. ‘तो एक कोण देशमुख 55 दिवस झालं आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय.. पाणी सोडलं? पाणी नाही काय सोडता.. मुतता का तिथं आता?... अवघडंय बाबा...पाणी प्यायला मिळंना, तर लघवी पण होईना,’ अशा अर्वाच्य भाषेत अजितदादांनी दुष्काळग्रस्तांची टर उडवली होती.

पवारांनी दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे विधिमंडळात पडसाद उमटत असतानाच मनसेसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे.

पवारांच्या विरोधात 12 एप्रिलला सगळ्यांनी एकत्र येण्याचे शिवसेनेने आवाहन केले होते. परंतु त्याआधीच मनसेने आंदोलनात आघाडी घेत दादर आणि माहीममध्ये आंदोलन करण्यात आले.

शिवसेना कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. पवार जोपर्यंत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचाही इशारा शिवसेनेने दिला आहे.