आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे पक्ष फक्त कार्यकर्त्यांचा, राज ठाकरेंच्या कुटुंबाचा नाही - राज ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा असून तो माझ्या कुटुंबाचा नाही,' असे स्पष्ट करत आपल्या कुटुंबीयांपैकी कुणाचेही छायाचित्र पक्षाच्या होर्डिंग्जवर लावायचे नाही, अशा सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिल्या. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची लवकरच स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी पनवेल येथील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरादरम्यान केली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीला मनसेने सुरुवात केली असून राज्यभरातील निवडक पदाधिकाऱ्यांचे शिबिर पनवेल येथील आयुष रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते. या दोनदिवसीय शिबिराच्या समारोपाच्या भाषणात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनातील प्रश्नांची दखल घेतली. पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील शंका किंवा प्रश्न लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन राज यांनी केले होते.

त्यावर राज्यातील शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नांवर पक्षाची भूमिका, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यकर्त्यांसाठी नियमित कार्यक्रमांचा अभाव, माध्यमांशी संपर्काच्या मुद्द्यावर पक्षाचे अपयश, राज्य सरकारच्या निर्णयावर पक्षाची अधिकृत भूमिका योग्य वेळी जाहीर करण्यात येत असलेले अपयश, अशा विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांनी थेट राज ठाकरे यांना लेखी प्रश्न विचारले होते. आपल्या भाषणात राज यांनी या सर्व प्रश्नांचे समाधान करत पदाधिकाऱ्यांशी तब्बल दीड तास संवाद साधला.
पुढे वाचा...
> अमित, शर्मिलांचे फोटो नको
>कार्यकक्षा ठरवणारी पुस्तिका
बातम्या आणखी आहेत...