आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयकर विभागाची परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उधळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयकर विभागाची स्टेनो पदासाठीची परीक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उधळली आहे. मुलुंडमधील डी वॉर्ड परिसरातील परीक्षाकेंद्रात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्यावरून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. परीक्षा रद्द न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करु असा इशारा देण्यात आला होता.

आयकरविभागाने आज स्टेनो पदासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी एकही मराठी उमेवार नाही, असे कारण पुढे करत कार्यकर्त्यांनी परीक्षा उधळून लावली. त्यानंतर आयकर विभागाने परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, ही परीक्षा नंतर केव्हा घेणार याबद्दल आयकर विभागाने काहीही सांगितलेले नाही.