आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Party Worker's Demands To Decleared Raj Thackeray As A Cm Candiate

राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा- पदाधिका-यांची बैठकीत मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पानीपत झाल्याने व सर्वच्या सर्व उमेदवारांची उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने प्रचंड नैराश्यात असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या राज्यभरातील पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पहिल्या सत्रात प्रमुख नेत्यांनी पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच दुस-या व सायंकाळच्या सत्रात स्वत राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करतील. मात्र त्याआधीच राज्यभरातील पदाधिका-यांनी पक्षात जान आणणे व कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंना थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी लावून धरली. अखेर आमदार प्रविण दरेकर यांनी आपली मागणी व इच्छा राज ठाकरेंना कळवू, असे दरेकर यांनी उपस्थित पदाधिका-यांना सांगितले.