आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद, बीड, जालन्यात मनसेची रेन हार्वेस्टिंग योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दुष्काळग्रस्त जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवण्यात येणार आहे. यात औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील गिरसावळी, नरला आणि मारसावळी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या योजनची सुरुवात करण्यात आली. 14 जूनपर्यंत राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.राज ठाकरे म्हणाले, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत अशा प्रकारे पाणी साठवले तर तेथील पाण्याची समस्या काही प्रमाणात संपुष्टात येईल. त्यामुळे आम्ही दुष्काळग्रस्त भागातही ही योजना राबवणार आहोत.

बीड तालुक्यातील शिरूर येथील ब्रह्मनाथ येळंब, यावलवाडी, पाटोदा तालुक्यातील मयूर अभयारण्य (नायगाव), जालना तालुक्यातील खरपुडी, गुंडेवाडी, पीरपिंपळगाव, सोलापूर तालुक्यातील पंढरपूर तालुक्यातील गादेगाव आणि मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी व तळसंगी गावात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ प्रकल्प पूर्ण केला जाईल.