आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची वांद्रे कोर्टात हजेरी; एक जुलैला पुढील सुनावणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता वांद्रे कोर्टात हजेर झाले. राज यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सन 2008 मध्ये रेल्वे भरतीसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरेंना सहआरोपी केले होते.
त्यानंतर राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तणावही निर्माण झाला होता.

घटनेच्या दिवशी राज ठाकरे घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, असा युक्तीवाद ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टासमोर केला. न्यालयाने ठाकरेविरुद्ध वॉरंट रद्द करुन पुढील सुनावणीला हजर राहणाचे आदेश कोर्टाने दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी एक जुलैला होणार आहे.

दरम्यान, 2008 मध्ये राज ठाकरे यांनी परप्रांतियांविरोधात चिथावणीखोर भाषण केले होते. यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे भरतीसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करत राज ठाकरे यांना सहआरोपी केले होते. परंतु या आधी वांद्रे कोर्टातील सुनावणी राज वारंवार अनुपस्थित राहात होते. त्यामुळे न्यायालयाने राज यांच्याविरूद्ध वॉरंट बजावून 12 जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.