आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेकडून फोटोंचे \'राज\'कारण? वेबसाइटवर अपलोड केले दुर्मिळ छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेने आपल्‍या टि्वटर  हँडलवर अपलोड केलेले फोटोज - Divya Marathi
मनसेने आपल्‍या टि्वटर हँडलवर अपलोड केलेले फोटोज
मुंबई - महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने आपली अधिकृत वेबसाइट आणि टि्वटर हँडलवरून आज (सोमवार) मनसेचे संस्‍थापक राज ठाकरे, जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो अपलोड करून आदित्‍य यांना टॅग केलेत. त्‍यामुळे या मागे मनसेचे कोणते 'राज'कारण आहे, या बाबत चर्चेला ऊत आला.
काल्‍याण-डोंबिवली पृष्‍ठभूमिवर आठवणींना उजाळा
येत्‍या काहीच दिवसांत कल्‍याण-डोंबवली पालिकेच्‍या निवडणुका होऊ घातल्‍या आहेत. त्‍यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्‍यास सुरुवात केली आहे. दरम्‍यान, या निवडणुकीला धरूनही या फोटोजचे अर्थ लावले जात आहेत.
लहानपणी कसे दिसत होते यासाठीच उठाठवे
काही दशकांपूर्वी राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे कसे दिसायचे याची उत्सुकता सगळ्यांना नक्कीच असेल, म्हणूनच हे खास फोटोज अपलोड केल्‍याचे मनसेने आपल्‍या संकेतस्‍थळावरून स्‍पष्‍ट केले आहे.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...