आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Reach To People Through Aap Manner, Not Going With BJP Shivsena

\'आप\'च्या धर्तीवर यश मिळवण्‍याचा मनसेचा प्रयत्न, भाजप-शिवसेनेबरोबर न जाण्‍याचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी माणूस व राज्याचे नवनिर्माण करण्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडत स्वत:चा पक्ष स्थापन करणारे राज ठाकरे राज्यात आम आदमी पक्षाप्रमाणे यश मिळवण्याचा प्रयत्न करणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतील सूत्रांनी दिली आहे. भाजप-शिवसेनेबरोबर कोणत्याही परिस्थितीत न जाण्याचा आणि स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे.
एक वर्षापेक्षा कमी कालावधीत
राजकीय क्षेत्रात पदार्पण करूनही अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीच्या सत्तेवर नेऊन बसवले. सामान्य माणसांच्या प्रश्नाला हात घालतानाच तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपने आपलेसे केले. वरच्या आणि तळातील वर्गाला एकाच वेळी आकर्षित करण्याचा आपचा फंडा अनेक पक्षांना आकर्षित करू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता तरुणांसह तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे. शिवसेना आणि भाजपपेक्षा जास्त जागा कशा मिळवता येतील याकडे मनसे नेते गंभीरतेने लक्ष देत आहेत.
विधिमंडळात शिवसेना-भाजपतर्फे मनसेला गृहीत धरले जात असल्याबद्दल मनसे नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या बैठकीत घेतलेला निर्णय विधिमंडळात मात्र फिरवला जात असल्याची तक्रार नांदगावकर यांनी केली होती. ‘दिव्य मराठी’शी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, सकाळी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत आम्ही जे ठरवायचो त्याच्या विरोधात भाजप-सेना विधिमंडळात भूमिका घेत असे. आम्हाला ते गृहीत
धरून चालले होते. आमचाही पक्ष आहे आणि राज्यात आम्हालाही वेगळे स्थान आहे; परंतु आम्ही त्यांच्या मागे फरपटत जावे, असे त्यांना वाटत होते. हे वागणे अत्यंत चुकीचे आहे.शिवसेना आणि भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावावर राज्यात यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईत झालेली मोदींची सभा ही भाजपने ताकद दाखवण्यासाठीच आयोजित केली होती.
जानेवारीच्या शेवटी बैठक
नरेंद्र मोदींच्या नावावर भाजप-शिवसेना लक्ष देणार असल्याचे लक्षात आल्यावर मनसेने आता आपच्या धर्तीवर जनतेपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या शेवटी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका बैठकीचे आयोजन केले असून यामध्ये निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली जाणार आहे.