आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेकडून संजय निरूपमांच्या घराबाहेर पोस्टरबाजी, निरूपमांना म्हटले \'परप्रांतीय भटका कुत्रा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत संजय निरूपम यांच्या लोखंडवालामधील घराबाहेरील रस्त्यावर \'परप्रांतीय भटका कुत्रा\' असे म्हणत डिवचले आहे. - Divya Marathi
मुंबईत संजय निरूपम यांच्या लोखंडवालामधील घराबाहेरील रस्त्यावर \'परप्रांतीय भटका कुत्रा\' असे म्हणत डिवचले आहे.

मुंबई- मनसे आणि काँग्रेस यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे. मुंबईत संजय निरूपम यांच्या लोखंडवालामधील घराबाहेरील रस्त्यावर 'परप्रांतीय भटका कुत्रा' असे म्हणत डिवचले आहे. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दाखवून भाजपवरही निशाणा साधला आहे. 

 

मनसे-निरूपम यांच्यात फटकेबाजी-

 

संजय निरूपमांच्या कार्यालयावर मनसेचा सर्जिकल स्ट्राईक-

 

मनसेचा भैय्या संजय निरूपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. इट का जवाब पत्थर से मिलेगा असे म्हणत या हल्ल्याचे देशपांडे यांनी समर्थन केले होते. दरम्यान, हा हल्ला संदीप देशपांडे यांनी नियोजितपणे घडवून आणल्याचे समोर आले आहे. यासाठी देशपांडे यांनी गुरूवारी मनसेच्या नवी मुंबई आणि रायगड परिसरातील कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस कार्यालयाची रेकी केल्याचे समोर येत आहे.

 

काँग्रेसकडून राज ठाकरेंच्या प्रतिमेचे दहन-

 

दरम्यान, पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन केले तसेच चप्पलाचा मार दिला. मनसेच्या पक्षाच्या झेंड्याचेही यावेळी दहन केले.

 

मनसेचे लोक नपुसंक- संजय निरूपम-

 

मनसेचा हल्ला हा भ्याडपणाचा नमुना आहे. मनसेचे कार्यकर्ते लुच्चे आणि नपुंसक आहेत. आमच्या कार्यालयात कोणीही नसताना त्यांनी हा हल्ला केला. कार्यालयापासून पोलिस स्टेशन केवळ 25 मीटर दूर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर मनसेला करारा जवाब दिला जाईल असे संजय निरूपम यांनी टि्वट केले आहे.

 

हा तर शिवरायांनी आम्हाला शिकवलेला गनिमी कावा- संदीप देशपांडे

 

निरूपम यांच्या या टीकेला संदीप देशपांडे यांनी प्रत्तुत्तर दिले आहे, हा हल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेल्या गनिमी काव्याचा प्रसाद आहे. अवैध ठिकाणी गाड्या लावून नका म्हणून सांगायला जाणा-या फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर छक्क्यांसारखा हल्ला मग निरूपम समर्थकांनी का केला असा सवालही संदीप देशपांडे यांनी विचारला.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती...

बातम्या आणखी आहेत...