आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा उद्या सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’, राज यांचे सोशल मीडियातूनही आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उद्या (5 ऑक्टोबर) मुंबईत ‘संताप मोर्चा’ची हाक दिली आहे. मेट्रो जंक्शनपासून मोर्चाला सकाळी साडे अकरा वाजता प्रारंभ होणार असून चर्चगेट स्टेशनजवळ विसर्जित होईल.

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सोन्यासारखी सत्ता जनतेने यांच्या हातात दिली, आधीच्या सरकारपेक्षा काही चांगले घडेल, असा आशावाद निर्माण झाला आणि तो त्यांनी इतक्या लवकर उद्धवस्त केला.’ अशी टीकाही मनसेने सरकारवर केली आहे. हा मोर्चा केवळ रेल्वे प्रशासनाविरोधात नाही तर इतर विषयांबाबतही असल्याचे मनसेने म्हटले आहे.

#रागव्यक्तकरा #ExpressYourAnger या हॅशटॅगखाली राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून जनतेला आवाहन केले आहे. हा मोर्चा माझा, माझ्या पक्षाचा नाही तर आपला आहे..., अशा शब्दात मोर्चात सहभागी होण्यासाठी राज यांनी म्हटले आहे.

अघोषित आणीबाणी...
देशात एक अघोषित आणीबाणी आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा, अशी मनसेने भूमिका घेतली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. मनसेचे पत्र..
बातम्या आणखी आहेत...