आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत देश सोडावा, मनसेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसे प्रमुख राज ठाकरे - Divya Marathi
मनसे प्रमुख राज ठाकरे
मुंबई - उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत देश सोडण्याचा इशारा दिला. अन्यथा ते काम करत असलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण बंद पाडू, असेही मनसेकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे आणि चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे म्हणाल्या, पाकिस्तानचे दहशतवादी एकीकडे भारतीय जवानांवर हल्ले करत असताना त्यांच्या कलाकारांना काम देणे कितपत योग्य आहे. आम्ही संबंधित चित्रपट निर्मात्यांना पत्रही पाठवले आहे. या कलाकारांनी ४८ तासांत देश सोडावा, अन्यथा त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडण्यात येईल. जर त्यांनी देश सोडला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना पिटाळून लावू. देशात अनेक कलाकारांना काम मिळत नाही. मात्र, आपले निर्माते पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेतात, हे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा करण जोहरच्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटात काम करत आहे, तर महिरा खान ही शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी कलाकारांना पूर्ण संरक्षण देणार असल्याचे सांगितले.

गुलाम अलींनाही विरोध
गेल्या वर्षी प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली मुंबईत एका कार्यक्रमासाठी येणार होते. मात्र, शिवसेनेने इशारा दिल्यानंतर त्यांनी आपला मुंबई आणि देशातील इतर नियोजित कार्यक्रम रद्द केला होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहे माहिरा खान...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...