आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेकडून स्वस्तात कांदा विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कांद्याच्या भावात अचानक वाढ झाल्याने सामान्य ग्राहक व गृहिणींच्या डोळय़ात सध्या पाणी आलेले आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याचे दर सुमारे 50 ते 55 रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मुंबईत काही ठिकाणी स्वस्तात कांद्याची विक्री केली. मनसे नगरसेवक दिलीप लांडे म्हणाले, आम्ही आमच्या वॉर्डातील 16 हजार कुटुंबाना कांद्याची विक्री केली. शेतकर्‍यांकडून 22 रुपये किलो दराने कांदे विकत घेऊन ते नागरिकांना 25 रुपयांनी विक्री केले. बाजारात कांद्याचे भाव वाढले असले तरी शेतकर्‍यांना त्याचा थेट फायदा होत नाही. त्यामुळेच मनसेने हा उपक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले.