आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. लोकसभेची 'सेमी फायनल' म्हणून अनेकांनी याकडे पाहिले. चारही राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष वेधल्या गेले ते दिल्लीकडे. देशाचे राजकारण जिथून चालते ती राजधानी कॉंग्रेसने गमावली. त्यातही मुख्यमंत्री म्हणून 15 वर्षे सत्तेवर असलेल्या शीला दीक्षित यांचा दारुण पराभव झाला. कॉंग्रेसला हा फटका अगदी नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने (आप) दिला आहे. 'आप'चे हिरो ठरले ते अरविंद केजरीवाल. केजरीवाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. शीला दीक्षित यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णय अतिशय धाडसी होता. परंतु, त्यांनी कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का दिला. आता 'आप' महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यातही त्यांचा मुंबईवर फोकस राहणार आहे. महाराष्ट्रात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समीकरण बदलले होते. त्याचा फटका भाजपला आणि पर्यायाने युतीला बसला होता. आता दिल्लीतील निकाल पाहता 'आप'चे मुंबईतील पदार्पण या सर्व पक्षांना धोक्याचा इशाराच आहे. विशेषतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वेळीच दखल घ्यावी लागणार आहे. दिल्लीतील निकालानंतर 'आप' आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुलना करावीसी वाटते.
राज ठाकरेंपेक्षा केजरीवाल सरसच... वाचा पुढील स्लाईड्समध्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.