आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर मनसे स्टाईल; 'फेरीवाला मुक्त मुंबई'साठी शपथ घेणारे व्हिडिओ व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फेरीवाल्यांना विरोध करणारे मत व्यक्त करणारे व्हिडिओ  करायला सुरुवात केली आहे. 'नमस्कार, मी तर शपथ घेतली आहे. आपणही शपथ घ्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करा. चला फेरीवाला मुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया' असा मजकूर आणि सोबत प्रतिक्रिया दिलेला व्हिडिओ जोडत मनसेकडून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. 
 
सोशल मीडियाचा वापर करत हे मनसेने हे आंदोलन छेडल्यामुळे मनसैनिक सध्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. या व्हिडिओमध्ये कुणाला धमकी वजा इशारा किंवा थेट धमकी दिलेली नाही. तर शांतपणे मुंबईकरांना आवाहन केलेले आहे. मनसे स्टाईल आता सोशल मीडियावर देखील धुमाकूळ घालणार का ? लोकांचा या सोशल मोहिमेला किती प्रतिसाद मिळणार? मुंबईकर सोशल मीडियावर काय मत मांडणार की, या राजकारण्यांविरोधात रोष व्यक्त करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...