आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या मुद्द्यावर मनसे कार्यकर्त्यांची माजी नगरपालांच्या कार्यालयात तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी माणसाची हेटाळणी करणारा मजकूर फलकावर लावल्याचा आरोप करत मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी तोडफोड केली. मात्र, हा मजकूर मराठी माणसाची बदनामी करणारा नसून राजकीय सद्य:स्थितीवर भाष्य करणारा असल्याचे सांगत चुडासामा यांची मुलगी शायना एन सी यांनी मनसेला खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे.

कार्यालयाबाहेर फलकावर "प्रमोटिंग मराठी वेलकम, बट डिक्टेट मराठी नॉट वेलकम' असे लिहिले होते. हे भाष्य म्हणजे मराठी भाषिकांची बदनामी करणारे असल्याचा आरोप करत मनसेने या फलकासह चुडासामा यांच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.

चुडासामा यांची मुलगी आणि भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शायना एन सी यांनी या प्रकाराचा निषेध केला असून फलकावरच्या भाष्यात चुकीचे असे काहीही नसल्याचा दावा केला आहे. ही दडपशाही आम्ही जुमानणार नाही असे सांगत त्यांनी मनसेकडे सकारात्मक मुद्दे नसल्यानेच अशी दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला. तसेच काही आक्षेप असल्यास खुल्या चर्चेचे आव्हानही त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...