आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे सत्यः मुंबईतील परप्रांतीय विक्रेत्याने केली होती दादागिरी, नंतर MNS चे \'खळ्ळ खट्याक\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी भाजीविक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना शेतमाल विकू दिला जात नाही अशी तक्रार करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये परप्रांतीय फळविक्रेत्याला काल मारहाण केली. याची दुसरी बाजू आता समोर आली आहे.
यासंदर्भात शेतकऱ्याने सांगितले, की मी नाशिक जिल्ह्यातून मुंबईत भाजीविक्रीसाठी येतो. माझ्यासोबत म्हातारी आई, बायका-मुलं असतात. भाजीपाल्याची गाडी घेऊन आल्यावर फळविक्रेता अरेरावी करायचा. गाडी लावायची नाही असे दरडावून सांगायचा. मला माल विकू देत नव्हता. मी मुंबईचा नसल्याने त्याला काही म्हणणे मला शक्य नव्हते. पोलिसांकडे जाण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यामुळे मी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांकडे गेलो.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर परप्रांतीय फळविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मराठी भाजीविक्रेत्यांना आणि शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा दिली जात नाही तोवर असे आंदोलन केले जाईल, असे मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी आंदोलन
मुंबई महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी कार्डचा वापर करण्याचा विचार मनसेचा दिसून येत आहे. घाटकोपरला विक्रेत्याला झालेली मारहाण ही सुरवात असून आगामी काळात आणखी अशा प्रकारच्या घटना वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारने बाजार समित्यांचे नियंत्रण उठवले आहे
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेप्रमाणे आता शेतकऱ्यांना शहरांमधील बाजारपेठांमध्ये भाजी विक्री करण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शहरांमध्ये ठिकठिकाणी भाजी विक्री करताना दिसून येतात. या शेतकऱ्यांना हक्काची जागा द्या, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसेचे कार्यकर्ते म्हणाले...
परप्रांतीय विक्रेत्याला मारहाण करणारे मनसेचे कार्यकर्ते म्हणाले, की इतर कुणालाही गाडी लावू दिली जाणार नाही, असे या विक्रेत्यांनी सांगितले होते. यांची येथे दादागिरी सुरु होती. त्यांना समजेल अशा भाषेत आम्ही उत्तर दिले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.... असे करण्यात आले आंदोलन.... अखेरच्या स्लाईडवर बघा या घटनेचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...