आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेने उधळली आयकर विभागाची स्टेनो परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयकर विभागातर्फे स्टेनो पदाच्या भरतीत फक्त परप्रांतीयांनाच स्थान दिल्याचा आरोप करीत मनसेने शनिवारी या पदाची परीक्षा उधळून लावली. मनसेच्या आंदोलनानंतर आयकर अधिका-यांनी परीक्षा मागे घेतली.


आयकर विभागाने स्टेनो पदासाठी शनिवारी लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. मुलुंड येथील महापालिका कार्यालयात ही परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी आलेले सर्व उमेदवार अमराठी असल्याची माहिती स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना मिळाली, तेव्हा मनसेचे विभागाध्यक्ष सत्यवान दळवी यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते परीक्षास्थळी पोहोचले आणि त्यांनी परीक्षा घेण्यास विरोध केला. स्थानिक मराठी उमेदवारांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे आणि यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती द्याव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मनसे आंदोलनामुळे आयकर अधिका-यांनी परीक्षा मागे घेत असल्याचे सांगितले.


2008 मध्येही मुलुंड येथे स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा मनसेने याच मुद्द्यावरून उधळून लावली होती. ठाणे पालिकेसाठी क्लार्क पदाकरिता घेण्यात आलेली परीक्षा तसेच महापारेषणच्या परीक्षाही मनसेने यापूर्वी उधळल्या होत्या. कल्याण येथे रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीयांना मारहाण करून ती परीक्षाही उधळून लावण्यात आली होती.