आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Workers Vandalize Toll Booths On Raj Thackeray's Orders

टोलविरोधी आंदोलनांमुळे नव्या टोल धोरणाचा मसुदा; जाणून घ्या, कसे असतील टोलचे दर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात पेटलेल्या टोलविरोधी आंदोलनांमुळे नव्या टोल धोरणाच्या मसुदा बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. नव्या धोरणात प्रकल्पाच्या किमतीवर नव्हे तर किलोमीटरच्या आधारावर टोल आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल धोरणात अधिक पारदर्शकता येण्याची आशा आहे.
सध्या राज्यातील एकूण 167 टोल नाक्यांवर वसुली सुरू आहे. सरसकट त्या रस्त्याच्या कामासाठी आलेला खर्च आणि तो वसूल होईपर्यंत त्यावर प्रकल्प राबवणार्‍या कंपनीला भरावे लागणारे व्याज यांच्या आधारावर टोल वसुलीची रक्कम निश्चित केली आहे. मात्र आता नव्या धोरणानुसार त्यात बदल केले जातील. मात्र धोरण लागू झाल्यानंतर उभारण्यात येणार्‍या नव्या प्रकल्पांनाच हा नियम लागू होणार आहे. येत्या आठवड्यात होणार्‍या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नवे टोल धोरण चर्चेला येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील स्लाइडमध्ये, अशी होईल वसुली