आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे नगरसेवकांची उद्यापासून कार्यशाळा; राज ठाकरेंविरोधात अवमान याचिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी हॉटेल रेडिसन्स, अलिबाग, रायगड येथे सोमवार 16 ते 18 जुलैपर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: नगरसेवकांना कार्यशाळेत राजकारणाचे धडे देणार आहेत.
या कार्यशाळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रातील सरचिटणीस व नगरसेवक सहभागी होणार आहेत. शिबिरामध्ये अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना समाजकारण, राजकारण करता यावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हा नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाºयांना राजकारणातील डावपेच, पक्षशिस्त, शिष्टाचार, वेळेचं गणित, लोकांच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत यासर्व गोष्टीसंदर्भात जाणीव व्हावी यासाठी राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख पदाधिकाºयांसाठी केशवसृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे अशाच कार्यशाळेचे आयोजन केल्याचे आणि त्याचा चांगला फायदा झाल्याचेही मनसेतील वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले.
राज ठाकरेंविरोधात अवमान याचिका- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यास उच्च् न्यायालयाने अ‍ॅड. इजाज नक्वी यांना परवानगी दिली आहे. शिवाजी पार्क येथे जाहीर सभेसाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ठाकरे यांनी न्यायालयाच्या आदेशाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरेंकडून न्यायालयाचा वारंवार अवमान करण्यात येतो. त्यामुळे त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करू देण्याची विनंती नक्वी यांनी राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांच्याकडे केली होती.
फक्त डॉक्टरांनाच नव्हे, गर्भपात करणा-या आई-वडिलांनाही शिक्षा करा : राज ठाकरे