आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनीची एक झलक पाहाण्यासाठी पोहोचले हजारो फॅन्स, तोबा गर्दी पाहून झाली थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस सनी लियोनीचा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. याचा प्रत्यय नुकताच कोचीत आला. गुरुवारी ती एका प्रमोशनल प्रोग्रामसाठी कोलीला गेली होती. तिची एक झलक पाहाण्यासाठी हजारो फॅन्स आतूर झाले होते. लोक सकाळपासून कार्यक्रमस्थळी गोळा होत होते. फॅन्सचे एवढे प्रेम पाहून तर खुद्द सनीलाही आश्चर्याचा धक्का बसला.

फॅन्सने तोडले स्टेज...पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
- सनीचे कोचीत आगमन होताच फॅन्सनी एकच गर्दी केली.
- सनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओत फॅन्स स्‍टेजवर चढल्याचे दिसत आहे. पोलिस त्यांच्यावर लाठीचार्ज करताना दिसत आहे.
- सनीला पाहाण्यासाठी काही लोक स्‍टेजवर चढले तर काहींनी तिचे कट-आउट्स देखील तोडून टाकले. त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्‍यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

सोशल मीडियावर सनी म्हणाली.. 'थॅंक्स'
- सनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला अनुभव शेअर केला आहे. "कोचीतील फॅन्सचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. लोकांचे प्रेम आणि सहकार्य अद्भूत होते. मी सगळ्यांची आभारी आहे.'

पुढील स्लाइडवर पाहा... सनी लियोनीची एक झलक पाहाण्यासाठी फॅन्सनी केलेल्या गर्दीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...