आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये लागणार मोबाइल जॅमर टॉवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील जेलमध्ये कैद्यांकडून होणारा मोबाइलचा सर्रास वापर रोखण्यासाठी सध्या जॅमर लावले जातात; परंतु त्याचा विशेष उपयोग होत नाही. त्यामुळे आता प्रत्येक जेलमध्ये जॅमर टॉवर उभारण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि सुधीर तांबे यांनी पुण्यातील येरवड्याच्या जेलमध्ये कैद्यांकडे मोबाइल सापडल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सध्या आपण जेलमध्ये जॅमर बसवतो. परंतु, ते बंद करून कैदी मोबाइल वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे.

नुकतेच नागपूर कारागृहातून पाच कैदी फरार झाल्यानंतर तेथील भ्रष्ट यंत्रणा उघडी पडली आहे. तसेच या कारागृहातील अनेक मोबाइल सापडल्याचे समोर आले आहे. राज्यातील इतर कारागृहातही असे प्रकार रोखण्यासाठी शासन प्रत्येक जेलमध्ये जॅमर टॉवर उभारण्याचा विचार करत आहे. त्यामुळे जॅमर कोणाला बंद करता येणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.