आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल पेमेन्ट : पंधरा दिवसांत नवीन प्रणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मोबाइल फोनच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराला अधिक सुलभ करण्यासाठी नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन (एनपीसीआय) प्रयत्न सुरू केले आहेत. एनपीसीआय येत्या १५ ते २० दिवसांत या प्रणालीचे सोपे व्हर्जन सर्वांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.
सध्या देशात सुमारे ४० कोटी लाेक फीचर फोनचा वापर करत आहेत. या नव्या प्रणालीमध्ये इंटरनेटची आवश्यकता नसल्यामुळे गावातील डिजिटल व्यवहार तेजीने वाढणार आहेत. देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी बनवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीचेदेखील ते सदस्य आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू या समितीचे संयोजक आहेत. या समितीची पहिली बैठक गुरुवारी मुंबईत झाली. या बैठकीत बँकिंग क्षेत्रातील प्रमुखांचीदेखील उपस्थिती होती. युनिफाइट पेमेन्ट इंटरफेस (यूपीआय) वर सर्व बँका कोणत्या पद्धतीने काम करू शकतात, या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...