आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या जन्मदिनाचा चाहत्यांना फटका, 25 जणांचे फोन, पर्स गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुखच्या घराबाहेर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झालेली चाहत्यांची गर्दी. - Divya Marathi
शाहरुखच्या घराबाहेर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झालेली चाहत्यांची गर्दी.
मुंबई- बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान आज आपला 52 वा जन्मदिन साजरा करत आहे. त्यामुळे मुंबईतील त्याच्या मन्नत या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते जमले होते. पण याचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे 25 जणांचे फोन आणि पर्स चोरल्या आहेत.
 
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने चोरट्यांना पकडू; चोरट्यांचा दावा
- वांद्रे येथील शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर लोक त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते.
- या चाहत्यांच्या गर्दीत चोरटेही घुसले होते. गर्दीचा फायदा घेत त्यांनी अनेकांच्या पर्स आणि फोन लांबवले.
- आपल्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत वांद्रे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शाहरुखच्या बंगल्याबाहेर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांना पकडू असा दावा केला आहे. 
- पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तक्रारींची संख्या वाढू शकते. चोरटे अनेकदा गर्दीचा फायदा घेत अशा चोऱ्या करत असतात.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...