मुंबई- स्वंयघोषित आध्यात्मिक गुरु राधे मॉंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मॉडेल व अभिनेत्री आर्शी खानने हिने राधे मॉंवर खळबळजनक आरोप केले आहे. राधे मॉं सेक्स रॅकेट चालवत असून तिने त्यात
आपल्याला त्यात ढकलण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप आर्शी खानने केला आहे. या आधी डॉली बिंद्रा हिने राधे मॉंवर आरोप केला होता.
आर्शी खानने सांगितले की, राधे मॉं हिने तिच्या एका बिझनेस मॅनेजरशी भेट घालून दिली. या भेटीत राधे मॉंने आपल्याला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता.
पैसा आणि प्रसिद्ध हवी असल्यास आमच्या सेक्स रॅकेटच्या धंद्यात सहभागी व्हावी लागेल, असा प्रस्ताव राधे मॉंने हिने आर्शी खानला दिला होता.
शनिवारी (5 सप्टेंबर) सकाळी आर्शी हिने मुंबई पोलिसांत एक तक्रार दाखल केली. तिला अनेकदा फोनवरुन धमकी दिली जात असल्याचे आर्शीने तक्रारीत फटले आहे. फोन करणारा तिच्याशी अश्लील भाषेत बोलतो.
याशिवाय आर्शी खान अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. आर्शीने लखनौमध्ये एका भोजपुरी सिनेमाच्या निर्मात्याला कानशिळात लगावून वाद ओढवून घेतला होता. त्याचप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबतही आर्शीचे नाव चर्चेत आले होते.
आर्शी खान ही मॉडेल व अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत दाक्षिणात्य सिनेमात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी ती हैदराबादमध्ये एका तेलुगू सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
या आरोपांमुळे राधे मॉं अडचणीत...
> राधे मॉं भक्तांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप फॅशन डिझायनर कपिल अरोराने केले होता. राधे मॉंने तिच्या ओळखीतील 24 वर्षीय युवर्तीचे लैंकिक शोषण केले होते.
> अभिनेत्री डॉली बिंद्राने देखील राधे मॉंविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राधे मॉं आपल्या भक्तांना पोर्न व्हिडिओ दाखवते.
>राधे मॉंवर सेक्स पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.
>हिमाचल प्रदेशातील एका मंदिराच्या पुरोहितांने राधे मॉंवर आरोप केला आहे. राधे मॉंच्या सांगण्यावरुनच्या त्यांच्या दोन भक्तांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
>राधे मॉंवर मुंबईतील एका बिझनेसमनच्या सुनेने हुंड्यासाठी पती आणि सासरच्या लोकांना भडवल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील बोरीवली पोलिसांत याप्रकरणी राधे मॉंसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>राधे मॉंची स्कर्टवरील छायाचित्रे समोर आल्यानंतर मुंबईतील वकील फाल्गुनी ब्रह्मभट्टने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राधे मॉं धर्माच्या नावा खाली जनतेची फसवणूक करता आहे.
कोण आहे राधे मॉं?
राधे मॉं पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बिझनेसमन सरदार मोहन सिंगसोबत तिचा विवाह झाला. मात्र, विवाहानंतर ती एक महंताच्या संपर्कात आली. महंताकडून तिने दीक्षा घेऊन आध्यात्मिक जीवन स्विकारले. काही वर्षांपूर्वी मुंबईत आल्यानंतर राधे माला प्रसिद्धी मिळाली. राधे मॉं स्वत:ला अष्टभूजा देवीला अवतार समजते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राधे मावर खळबळजनक आरोप करणार्या आर्शी खानचे फोटो...