आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Accuses IAS Office Sunil Paraskar Of Rape, News In Marahti

सुनीस पारसकर यांच्याविरोधात तक्रार करणा-या मॉडेलला जिवे मारण्याच्या धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागरी हक्क संरक्षक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचा आरोप करून संपूर्ण पोलिस दलात खळबळ माजवून देणा-या मॉंडेलला आता जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमकीची तक्रार संबंधित मॉंडेलने पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर तिला संरक्षण देण्यात आले आहे. मुंबई पोलिस दलातील एका बड्या अधिका-याने या घटनेला दुजोरा दिला आहे.

या बलात्काराच्या गुन्हयाचा अहवाल पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांना देण्यात आल्याचेही या अधिका-याने सांगितले. गोरेगाव येथे राहणा-या एका मॉंडेलने गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर पारसकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास सध्या क्राईम ब्रॅंचचे अधिकारी करीत आहेत.

दोन दिवसापूर्वी पिडीत तक्रारदार मॉंडेलला एका अज्ञात क्रॅमांकावरून सतत फोन करण्यात आले. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकारी सुनील पारसकर यांच्याविरोधात दिली गेलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला बघून घेऊ अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्त मारिया यांच्याकडे या धमकीची तक्रार मॉंडेलनी दिली. मारिया यांनी तिच्या मागणीवरून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.