आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे न देणे जीवावर बेतले...अवघ्या 6 हजारांसाठी अभिनेत्री कृतिका चौधरीची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॉडेल कृतिका चौधरी हिच्या हत्येचा गुंता महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांनी सोडवला आहे. या प्रकरणी शकील नसीम खान (33) आणि बादशाह उर्फ बासुदास माकमलाल दास या दोघांना पोलिसांनी पनवेलमधून अटक केली आहे. शकील नसीम खान हा एक ड्रग्ज विक्रेता आहे. कृतिकाची अवघ्या 6 हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा धक्कादायक शकील याने केला आहे. ती आमचे 6 हजार देणे लागत होती. मात्र, तिने पैसे न दिल्याने तिची हत्या केल्याचे दोन्ही आरोपींनी कबूल केले.
दरम्यान, 12 जूनला रात्री कृतिकाची तिच्या राहात्या घरी निर्घृण हत्या करण्‍यात आली होती. पोलिस सूत्रांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेल येथून अटक केली. दोघेही आधीपासूनच कृतिकाला ओळखत होते. कृतिकाची हत्या झाली त्या रात्री दोघे तिच्या घरीच होते. पैशाच्या देवाण घेवाण करण्‍यासाठी ते कृतिकाच्या घरी गेल्याचे दोघांनी कबूल केले आहे. कृतिकासोबत दोघांची बाचाबाची झाली. दोघांपैकी एकाने फायटरने कृतिकाची निर्घृण हत्या केली. 

पैसे न देणे जीवावर बेतले
- कृतिकाला 'एमडी' ड्रग्जचे व्यसन होते, हे चौकशीत समोर आले आहे. ड्रग्ज माफीयाच्या ती संपर्कात होती. ती त्यांच्यासाठी काम करत होती. त्यातून तिने मोठा पैसाही कमावला होता. त्यावरून तिचे साथीदारांसोबत वाद झाला होता.
- सन्नी उर्फ आसिफ खान हा देखील त्यापैकीच एक ड्रग्स पेडलर होता. आसिफ आपल्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीने कृतिकाला ड्रग पुरवत असे. शकील खान देखील सन्नीच्या डिलिव्हरी बॉयपैकी एक होता. त्याने 7 ते 8 वेळा कृतिकाला 'एमडी' ड्रग्ज पुरवले होते.
- कृतिकाची हत्या करण्‍यापूर्वी मारेकर्‍यांनी तिच्या घरी जेवणही केले होते. कृतिकाची हत्या केल्यानंतर मारेकर्‍यांनी तिच्या रुममधील एसी सुरु केला होता. नंतर घराची साफसफाई केली होती.
- कृतिका आरोपींच्या संपर्कात होती, हे तिच्या कॉल रेकॉर्ड्‍सवरून समोर आले आहे. दोन्ही आरोपी ड्रग्ज सप्लायर आहेत. ते अनेकदा कृतिकाच्या घरीही आले होते.
- अंमलीपदार्थ विरोधी पथकाने फेब्रुवारी 2016 मध्ये सन्नीला दीड किलो 'एमडी'सह अटक केल्यावर शकील खान तिला ड्रग्ज पुरवू लागला.
- दरम्यान शकीलने कृतिकाला पुरवलेल्या ड्रग्सचे 6 हजार रुपये शिल्लक असताना ऑगस्ट 2016 मध्ये त्याला देखील अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर शाखेने अटक केली. नोव्हेंबरमध्ये शकील बाहेर आला.
- हत्येच्या काही दिवसांपूर्वी शकिलच्या मित्राला म्हणजेच बादशाहला पैशांची गरज होती. त्यासाठी त्याने शकीलला सांगितले आणि शकीलने कृतिकाच्यामागे पैशांसाठी तगादा लावला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... नेमके काय झाले होते त्या रात्री?
बातम्या आणखी आहेत...