आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Arrested For Cheating 54 Lakh From A Pune Based Industrialist, Marathi News

पुण्यातील उद्योगपतीला 54 लाखांना गंडा; 28 वर्षीय मॉडेलला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॉडेल आणि ग्लॅडरेग्स मिसेज इंडिया 2010 ची फायनलिस्टला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील एका उद्योगपतीला 54 लाख रुपयांना गंडविल्याचा तिच्यावर आरोप आहे. संगिता चिंटू चटलानी असे आरोपी मॉडेलचे नाव असून ती बॅंकॉक येथील रहिवाशी आहे. मिसेज इंडिया स्पर्धा 2010 मधील एडिशनमध्ये संगिता तिसर्‍या क्रमांकावर होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगपती जगदीश ससाने यांनी 28 वर्षीय मॉडेल सं‍गितला वांद्रे येथे स्पा सुरु करण्यासाठी 1.1 कोटी रुपये दिले होते. यातील नि‍म्मी रक्कम मॉडेलने हडपली.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश ससाने यांनी पुण्यात एक नवा फ्लॅट खरेदी केला होता. 2013 मध्ये सत्यनारायण पूजाही केली होती. ज्योतिष हितेन्द्र इंगळे याने ही पूजा केली होती. ज्योतिष इंगळेने ससाने यांना मुंबईत व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला होता. मुंबईत व्यवसाय सुरु केल्याने आणखी भरभराटी होईल, असेही सांगितले होते. विशेष म्हणजे यासाठी ज्योतिष इंगळे याने मॉडेल संगिता हिचा मोबाइल क्रमांकही ससाने यांना दिला होता. तसेच ज्योतिष इंगळे याने मॉडेल संगितालाही ससाने यांचा मोबाइल क्रमांक दिला होता. नंतर संगिताने स्वत: ससाने यांच्याशी संपर्क साधला. वांद्रे येथे स्पा सुरु केल्याचा चांगला नफा कमावता येऊ शकतो, असे सांगितले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मॉडेल आणि उद्योगपतीमध्ये असा झाला होता करार....