आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांच्या गावी उभे राहतेय आदर्श महाविद्यालय, पायाभरणी समारंभ बुधवारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितसमाज उद्धारक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकणातल्या गावी मुंबई विद्यापीठाने उभारलेल्या आदर्श महाविद्यालयास गावकऱ्यांनी १३ एकर जमीन देणगी रुपाने दिली असून दहा कोटी रुपये खर्चून उभारावयाच्या महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ बुधवारी होत आहे.
बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. मात्र त्यांचे लहानपण कोकणातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबवडे या त्यांच्या मूळ गावी गेले. याच गावात बाबासाहेबांचे प्राथिमक शिक्षण झाले. या गावातल्या शिक्षकाने बाबासाहेबांना ‘आंबवडेकर’ नाव बदलून आंबेडकर असे सुटसूटीत नाव बहाल केले.
ज्या जिल्ह्याची उच्च शिक्षण अभ्यासक्रमातील नाव नोंदणीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. देशातील असे ३७४ जिल्हे निवडण्यात आले आहेत. उच्च शिक्षणात मागे रााहिलेल्या या जिल्ह्यांमध्ये मॉडेल पदवी महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) घेतला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाअंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार मुंबई विद्यापीठाने बाबासोबांच्या मूळ गावी मॉडेल काॅलेजचा प्रस्ताव युजीसीकडे पाठवला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यास मंजुरी दिल्यानंतर तेथे २०१२ मध्ये तात्पुरत्या स्वरुपात महाविद्यालयाचेे काही वर्ग चालू करण्यात आले. परंतु, महाविद्यालय बांधण्यासाठी मोठी जागा काही केल्या उपलब्ध होत नव्हती. मुंबई विद्यापीठाने त्यासाठी आंबवडेच्या गावकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद देऊन गावकऱ्यांनी १३ एकर जागा महाविद्यालयास दिली आहे.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या गावात अ, आ, ई धुळाक्षरे गिरवली. त्या गावची पोरं आता आंबवडे या आपल्या गावीतच उच्च शिक्षण घेऊ शकणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या माॅडेल स्कूलमधे कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही विद्याशाखांचे वर्ग असणार अाहेत.
बाबासाहेबांनी आपल्या महान कार्याने कोकणपट्टीतील या चिमुकल्या गावाला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्याच गावच्या लेकरांनी आपली तेरा एकर जमीन दान करुन बाबासाहेबांचे काम आणखी उंचीवर नेऊन ठेवले आहे.
बाबासाहेबांचे गाव आहे कसे?
{ बाबासाहेबांचे गावात छोटे स्मारक आहे. तेथे बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत.
{ दरवर्षी आंबवडे गावास तीन लाख आंबेडकरी अनुयायी भेट देतात.
{ २००९ मध्ये या गावास राज्य शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.
{ भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी नुकतेच आंबवडे गाव दत्तक घेतले आहे. तेथे
विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आहे.
{ बौद्ध महासभेने या गावी बाबासाहेबांच्या अर्धांगिनी रमाबाई यांचे स्मारक उभारले आहे.
बातम्या आणखी आहेत...