आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत फिल्‍म एडीटरची आत्महत्या, पूर्व प्रियकरावर केला होता बलात्‍काराचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एका फिल्‍म एडीटरने मुंबईत आत्‍महत्‍या केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. पल्‍लवी झा असे तिचे नाव असून तिने मॉडेलिंगचेही काम केले आहे. मुंबईत ती एका खासगी कंपनीत एडीटींगचे काम करत होती.

पल्‍लवी (22) ही मुळची दिल्‍लीची आहे. पश्चिम उपनगरातील जोगेश्‍वरी येथे आदर्श नगर चाळीत 471 क्रमांकाच्‍या खोलीत ती भाड्याने राहत होती. प्रेम प्रकरणात अपयशामुळेच तिने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. यासंदर्भात तिचा प्रियकर शैलेंद्र शर्मा याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पल्‍लवी जोगेश्‍वरीतील खोलीत जयसिंह कासना या मित्रासोबत राहत होती. तो रविवारी रात्री उशीरा घरी परतला तेव्‍हा त्‍याला पल्‍लवीचा मृतदेह पंख्‍याला लटकलेला दिसून आला. त्‍याने तत्‍काळ पोलिसांना माहिती दिली. तसेच तिच्‍या घरीही कळविले. पल्‍लवीची आई वंदना सोमवारी सकाळी मुंबईत पोहोचली. त्‍यानंतर पल्‍लवीच्‍या पूर्व प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली. वंदना यांनी पल्‍लवीच्‍या आत्‍महत्‍येसाठी शैलेंद्र शर्मा यालाच जबाबदार ठरविले आहे.

शैलेंद्र शर्माला का ठरविले पल्‍लवीच्‍या आईने जबाबदार, वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...