आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेल एकता बब्बरची मुंबईत 16 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत एका 32 वर्षीय मॉडेलने आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीतून 16 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एकता बब्बर असे या मॉडेलचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, नैराश्यातून हे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. एकताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता ओशिवरा येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. मागील काही दिवसांपासून ती तणावात होती. तिच्या वडिलांचे मागील सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. आज सकाळी एकताने आपल्या राहत्या घरातून थेट उडी मारली. एकताचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच ते हजर झाले. पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.