आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Framed DIG Paraskar For Publicity: Former Lawyer

सुनील पारसकरांवरील मॉडेलचे आरोप खोटे; रिझवान सिद्दिकी रचलेला बनाव उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचे पोलिस उपमहासंचालक सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी मॉडेल आता स्वत:च वादात अडकली आहे. या मॉडेलचे माजी वकील रिझवान सिद्दिकी यांनी तिने रचलेल्या बनावाबद्दल संपूर्ण माहिती उघड केली आहे.

सिद्दिकी यांच्या मतानुसार, पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करून या मॉडेलला पब्लिसिटी मिळवायची होती आणि यातून ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमात प्रवेश मिळवायचा होता. सिद्दिकी यांनीच मागच्या महिन्यात मॉडेलकडून पारसकरांना नोटीस पाठवली होती. पारसकर हे वर्षभरापासून तक्रारकर्त्या मॉडेलशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांनी या नोटिसीत केला होता.

धमकी दिल्याचा आरोप
लाच न दिल्यास तुरुंगात डांबून टाकीन, अशा प्रकारची धमकी पारसकर यांनी आपल्याला दिल्याचा दावा या मॉडेलने तक्रारी केला होता. शिवाय, त्यांनी आपल्याला मेसेजेस आणि मेलही पाठवले. तसेच कॉफी शॉप आणि अन्य ठिकाणी भेटण्यास बोलावले होते, असा दावाही या मॉडेलने केला आहे. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना मात्र पारसकरांच्या बाजूने उभी आहे.