आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माॅडेल करण्याचे आमिष, फोटो काढून विनयभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माॅडेल बनवण्याचे आमिष दाखवून विवस्त्र फोटो काढत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली. गोराई पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एफ. पत्रावाला (२६) आणि सम्राट तांबे (२२, दोघेही रा. नालासोपारा, ठाणे) यांनी १७ वर्षीय मुलीला माॅडेलिगचेे आमिष दाखवले. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार अब्बास आणि सम्राट या दोघांनी तिला तुझी फिगर चांगली असून, आणखी काही औषधी घेतल्यास ती सुधारेल असे सांगितले. एका हाॅटेलमध्ये नेऊन त्यांनी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. नंतर तिचे विवस्त्र फोटो काढले. दुसऱ्या दिवशी बोलावून घेऊन आम्ही सांगू तसे वाग, नाही तर फोटो सोशल मीडियावर टाकू अशी धमकी या दोघांनी मुलीला दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...