आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुसलमान असल्याने घर सोडण्यास भाग पाडले- मॉडेल मिसबाह कादरीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- मिसबाह कादरी - Divya Marathi
छायाचित्र- मिसबाह कादरी
मुंबई- मॉडेल व गुजरातमधील मिसबाह कादरी कादरी हिने आरोप केला आहे की, मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीने मुस्लिम असल्याचे कारण सांगत फ्लॅट सोडण्यास भाग पाडले. कादरीने बुधवारी राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. सोसायटीने मात्र हा आरोप फेटाळून लावत मिसबाह चुकीचे बोलत असल्याचे म्हटले आहे. मागील आठवड्यात गुजरातमधील एका एमबीए पदवीधर मुस्लिम तरूणाने हिरे-डायमंड कंपनीवर मुस्लिम असल्याने नोकरी न दिल्याचा आरोप केला होता. अल्‍पसंख्‍याक आयोग या आरोपाची चौकशी करीत आहे.
काय आहे मिसबाहचा आरोप
25 वर्षाची कम्युनिकेशन्स क्षेत्रातील व्यावसायिक मिसबाहचे म्हणणे आहे की, मागील काही दिवसात मी वडाळा ईस्ट येथील एका फ्लॅटमध्ये राहायला गेला. जेव्हा सोसायटीला कळाले की मी मुस्लिम आहे तेव्हा आठवड्याभरात तेथून मला काढून टाकले. मिसबाहने सांगितले की, याआधी मला लोअर परेलला पेईंग गेस्ट म्हणून राहताना ब्रोकरने सांगितले होते की येथे राहायचे तर मुस्लिम कपडे घालू नयेत तसेच आपला मुस्लिम परिचय व नाव सांगू नये.
बिल्डिंगच्या सुपरवाइजरने आरोप नाकारले-
ज्या संघवी हाईट्स सोसायटीवर आरोप लावण्यात आला आहे तेथील सुपरवायजर राजेश याने म्हटले आहे की, ''फ्लॅटमधून काढून टाकण्याचे कारण ब्रोकर आणि टेनेंट यांच्यातील वाद कारणीभूत आहे. या इमारतीत मुस्लिमांना राहण्यास परवानगी आहे व अनेक मुस्लिम लोक येथे राहत आहेत. हा ब्रोकर आणि संबंधित महिला यांच्यातील वाद कारणीभूत आहे. सोसायटीचा याच्याशी काहीही संबंध नाही.
हिंदुत्त्ववादी संघटनावर आरोप-
महाराष्ट्र अल्पसंख्यक आयोगाचे सदस्य गुलजार आझमी यांनी या घटनेला हिंदुत्त्ववादी संघटनांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, मुंबईत यापूर्वी असे घडत नव्हते. जेव्हा या देशात उजव्या विचारसारणीचे सरकार आले तेव्हा हिंदुत्त्ववादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. त्या लोकांना मुस्लिम सुख-शांतीने रहावा असे मूळीच वाटत नाही. आम्ही त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे की, मुस्लिम असल्याने कोणी हिंदु फ्लॅट खाली करायला लावेल असे वाटत नाही. काही लोक व संघटना मुस्लिम समाजात भीती निर्माण करून आपले दुकान चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काँग्रेस समर्थकाने केली कारवाईची मागणी-
मुस्लिम असल्याने मुंबईत जर तरूणीला फ्लॅट सोडायला लावले असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस समर्थक शहजाद पूनावाला यांनी केली आहे. पूनावाला म्हणाले, धर्म-जातीवरून लोकांना घर अथवा नोकरी नाकारणा-यांविरूद्ध कारवाई केली पाहिजे. असा भेदभाव राज्य सरकारने रोखला पाहिजे. त्यासाठी कायदा बनविला पाहिजे. तसे असे कृत्य करणा-याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा.
पुढे आणखी वाचा यासंबंधित माहिती.. मिसबाहला सोशल मिडियातून सहानुभूती...
बातम्या आणखी आहेत...