आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Poonam Pande News In Marathi, Police Action, Divya Marathi

भररस्त्यात अश्लील वर्तन करणा-या मॉडेल पूनम पांडेवर पोलिसांची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भररस्त्यात अश्लील वर्तन करणा-या मॉडेल पूनम पांडे हिला शुक्रवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, काही वेळातच पोलिसांनी समज देऊन तिला सोडून दिले. शुक्रवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत पूनम मीरा रोड येथे आली होती. या वेळी ती अत्यंत तोकड्या कपड्यांत होती.
तसेच तिने भररस्त्यात पोलिसांकडे पाहून अश्लील हावभाव व इशारे केले. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिला अटक केली. दरम्यान, पूनमने या आरोपांचे खंडन करून मी असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही पूनमने अनेकदा जाहीररीत्या न्यूड फोटोशूट केले आहे.