आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेल बलात्कार; आरोपींच्या कोठडीत ५ मेपर्यंत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिस ठाण्यात नेऊन मॉडेलवर बलात्कार करून रक्कम लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन पोलिसांसह आठ जणांच्या पोलिस कोठडीत ५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या वेळी सरकारी वकिलांनी सांगितले, आरोपींचा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग आहे का, याची आम्ही चौकशी करत आहोत. त्यामुळे आराेपींची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यावर कोर्टाने त्यांच्या कोठडीत केली. दरम्यान, आरोपी पोलिसांनी पीडित मॉडेलकडून लुटलेल्या रकमेपैकी ३ लाख ७५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. ३ एप्रिल रोजी मॉडेलवर पोलिसांनी बलात्कार करून तिच्याकडील रोख रक्कम लुटली होती.