आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनॅप करुन मॉडेलला ठरवले प्रॉस्टिट्यूट, ठाण्यात पोलिसांनी केला बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पोलिसांनी एका मॉडेलवर बलात्कार करून तिची रोख रक्कम दागिने लंपास केल्याची घटना मुंबईत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मॉडेलने पोलिस आयुक्तांना एसएमएस करून याबाबत तक्रार दिली हाेती. त्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष मॉडेलची तक्रार ऐकून घेत दाेषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी दाेन पाेलिस अधिकारी, एक महिला पाेलिसासह सहा जणांना अटक करण्यात अाली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस अधिकारी सूर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल कोडे आणि एका महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. पीडित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये असताना अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे.

पीडित मॉडेलने 21 एप्रिल रोजी पोलिस आयुक्तांना एसएमएस करून आपल्यावर पोलिसांनी बलात्कार केल्याची तक्रार करून मदतीची याचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी पीडितेला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसीतील तीन पोलिस कर्मचारी इतर तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पंचतारांकित हॉटेलमधून झाले अपहरण
पीडित महिलेचे म्हणणे आहे, की ही घटना 3 एप्रिल रोजीची आहे. पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीच दाद दिली नाही. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी साकीनाका पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या पंचतारांकित हॉटेल बाहेर मला अडवले आणि माझे अपहरण करुन अतिप्रसंग केला. महिला हॉटेलमध्ये तिच्या मित्राला भेटायला गेली होती. पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना दिलेल्या तक्रारीत मॉडेलने कैफियत मांडली की, तिच्यावर वेश्या असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि सोडून देण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली.