आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉडेल साक्षी पारेखच्या कारने दिलेल्या धडकेत 1 ठार, तर 4 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मॉडेल साक्षी पारेखच्या कारने दोन रिक्षा व एका दुचाकीला धडक दिल्याने एक ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी खार भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या दिलीप सोनी (30) या दुचाकीस्वाराचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.


इजहार अहमद सिद्दिकी, लोकेश यादव अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत, तर इतर दोघांची नावे समजू शकले नाहीत. अपघातात साक्षीलाही किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. साक्षी शुक्रवारी सकाळी 11 वाजता कारमधून कांदिवली येथे जात होती. याच वेळी तिचे नियंत्रण सुटल्याने कारने दोन रिक्षा व एका दुचाकीला धडक दिली. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्षीला पोलिसांनी अटक केली असून ती दारू पिऊन गाडी चालवत होती का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तिच्या रक्ताचे नमुनेही घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानवरही हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा आरोप
निश्चित करण्यात आलेला आहे.