आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model\'s Complain Against Prostitution At Mumbai

मुंबईत सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश; वेश्यांना लपवण्यासाठी बारमध्ये आलिशान तळघर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- मुंबईतील दहिसरमध्ये पोलिसांच्या समाजसेवा शाखेने एका बारवर छापेमारी करून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी या कारवाईत 65 जणांना अटक केली.

दहिसर येथील 'एम फॉर यू' या बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा छापा टाकला. तेव्हा बारगर्ल्स डान्स करत होत्या. ग्राहक मोठ्या संख्येने जमले होते. परंतु पोलिसांची अचानक धाड पडताच त्यांचा एकच गोंधळ उडाला. उल्लेखनिय म्हणजे बार मालकाने बारगर्ल्सला लपविण्यासाठी बारमध्येच आलिशान तळघर केल्याचेही उघड झाले आहे. तळघरात जाण्‍यासाठी स्लॅबला स्लाईल्सचा दरवाजा करण्यात आला होता.

पोलिसांची धाड पडताच सगळ्या बारगर्ल्सला तळघरात लपवण्यात आले होते. बारमध्ये एक अलार्म लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या अलर्मचे बटन बारबाहेर असलेल्या पान टपरीवर होते. पोलिसांना तळघराची भिंत तोडून तरुणांना बाहेर काढले. पोलिस तळघरात पोहचताच अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनाही प्राचारण करण्यात आले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.