आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला कॅबिनेट खात्यासह मोदी सरकारमध्ये आणखी दोन मंत्रिपदे मिळणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- महाराष्ट्रात फडणवीस मंत्रिमंडळात सामील झालेल्या शिवसेनेला केंद्रातील मोदी सरकारमध्ये आणखी दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेत आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला 2 मंत्रिपदे देण्याबाबत सहमती झाली आहे. यात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री असेल. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ जानेवारी किंवा फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. मोदी आपल्या सरकारमधून तीन-चार मंत्र्यांना वगळण्याचा विचार करीत आहेत. यात नजमा हेपतुल्ला यांच्यासह आणखी दोन निष्क्रिय भाजप मंत्र्यांचा समावेश आहे.

अडसूळ, खैरे कॅबिनेटच्या रेसमध्ये- मोदी मंत्रिमंडळात सध्या शिवसेनेच्या कोट्यातील अनंत गिते एकमेव मंत्री आहेत. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यमंत्रीपदासाठी राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांचे नाव निश्चित आहे. असे असले ती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाच्या नावावर अद्याप निर्णय घेतला नाही.
कॅबिनेटमंत्रिपदी सेनेकडून आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. अडसूळ यांनी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. तर, खैरे सध्या संसदेच्या एका स्थायी समितीचे अघ्यक्ष आहेत. अशा वेळी उद्धव अचानक आढळराव यांचे नाव पुढे करू शकतात. खैरे यांची अमित शहा-मोदींशी असलेली जवळीक उद्धव यांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे खैरेंच्या नावावर फुली मारली जाईल असे संकेत आहेत. विदर्भात शिवसेनेला विधानसभेला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे अडसूळ यांच्याऐवजी पश्चिम महाराष्ट्राला उद्धव पसंती देऊ शकतात. त्यामुळे आढळराव कॅबिनेटमंत्रीपदाचे डार्क हॉर्स ठरतील असे सेनेच्या गोटातील म्हणणे आहे.
9 नोव्हेंबर रोजी झालेल्या मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देसाई मंत्री बनता बनता राहिले होते. मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहचल्यानंतर भाजपावर नाराज असलेले उद्धव यांनी देसाईंना विमानतळावरून माघारी मुंबईला पाचारण करून घेतले होते. त्यावेळी शिवसेनेचे अडगळीत पडलेले नेते सुरेश प्रभूंना रेल्वेमंत्री बनवून मोदींनी सर्वांना धक्का दिला होता.