आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोग उपचारासाठी लागणारी उपकरणे देशातच तयार करा; स्टर्ट-अप्सला पीएम मोदींचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात कर्करोगावर उपचार केले जात असताना त्यासाठी लागणारी उपकरणे 70 टक्के वैद्यकीय उपकरणे ही परदेशातून आयात केली जातात. हा प्रकार थांबवण्यासाठी सर्व उपकरणे देशातच तयार करण्यासाठी स्टार्ट-अप्स हवे आहेत असे पीएम नरेंद्र मोदींनी व्यक्त केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त मोदींनी एका पुस्तकाचे अनावरण केले. यावेळी बोलताना त्यांनी कर्करोग संदर्भात देशभरातील आकडेवारीवर चिंता व्यक्त केली. 
 
30 वर्षांत दुपटीने वाढणार कर्करोगाचे रुग्ण
- आपल्या देशात दरवर्षी सरासरी 10 लाख लोकांना कॅन्सर असल्याचे निदान होत आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची सरासरी संख्या 6.5 लाख आहे. 
- एका संशोधनाचा उल्लेख करताना, येत्या 30 वर्षांत कर्करोग असलेल्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होणार अशी चिंता मोदींनी व्यक्त केली. 
- मोदी म्हणाले, कॅन्सरवर उपचारासाठी आजही 70 टक्के उपकरणे परदेशातून मागवली जातात. त्यामुळे, कर्करोगावर उपचार महागला आहे. ही परिस्थिती बदललीच पाहिजे. मी नव्या कंपन्यांना आवाहन करतो की त्यांनी कर्करोग उपचारात वापरल्या जाणारी उपकरणे देशातच तयार करावी. याचा थेट फायदा रुग्णांना होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...