आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Fadnavis Trouble Increase, Own Ministers Discontented

मोदी, फडणवीसांची डोकेदुखी वाढणार! स्वपक्षीय असंतुष्ट मंत्री, नाराज नेतेही ‘संधी साधण्या’ची भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आम आदमी पक्षाला दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा राज्याच्या राजकारणावर थेट परिणाम होणार आहे. मोदी लाटेला ओहोटी लागल्याचे संकेत मिळाल्याने आजवर भाजपसमोर शरणागतासारखी वागणारी शिवसेना आक्रमक तर होईलच, शिवाय भाजपमधील असंतुष्ट नेते संधी मिळताच उठाव करतील, असे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे केंद्रात मोदींच्या व राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याचा ताप वाढणार यात शंका नाही.

केंद्रात व महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात सरकारमध्ये असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी काँग्रेसला डिवचण्याचे काम केले. काँग्रेसने आपल्याला गृहीत धरू नये, असा संदेशही यामागे होता. त्याच पावलावर आता शिवसेना पावले टाकू लागली आहे. त्यामुळेच दिल्लीतील अपयशात नरेंद्र मोदींचा पराभव असल्याच्या अण्णा हजारेंच्या प्रतिक्रियेशी आपण सहमत असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपची खोडी काढली. ‘कोणत्याही लाटेपेक्षा जनतेची सुनामी मोठी असते,’ असा टोला मोदींना लगावत ‘ निमंत्रण मिळाल्यास आपण स्वत: अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीस हजेरी लावू’, असे वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या दु:खावर मीठ चाेळण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे वाचा .. भाजपमधील अंतर्गत खदखद वाढणार