आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारने जाहिरातींवर केला ३५ कोटी रुपये खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मे महिन्यात सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारने मुद्रित माध्यमात जाहिरातींवर ३५.५८ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआयद्वारे उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २६ मे २०१६ रोजी मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरातील आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन केलेल्या खर्चाची माहिती केंद्राला विचारली होती. डीएव्हीपीतील माहिती अधिकारी रूपा वेदी यांनी प्रादेशिक वृत्तपत्रासह राष्ट्रीय स्तरावरील एकूण ११,२३६ वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींबाबतची माहिती दिली.
ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, विकास की रफ्तार, बढा कारोबार, जन जन का उद्धार आणि रालोआ सरकारची दोन वर्षे या शीर्षकाअंतर्गत जाहिराती दिल्या आहेत. गलगली यांनी २००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या खर्चाचेही विवरण मागितले. डीएव्हीपीने तसा खर्च झाला नसल्याचे स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...