आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi In Mumbai For Latadidi Famous Song, Ye Mere Vatan Ke Logo...

नरेंद्र मोदी- लतादीदींचा आज सूरात सूर, \'ऐ मेरे वतन के लोगों\'साठी मुंबईकर सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी...’ ‘भारतरत्न’ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या या अक्षय गीताला आज 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आज सायंकाळी 6.30 वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लाखो मुंबईकर एका स्वरात हे अजरामर गीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत गाणार आहेत. उद्धव ठाकरेंही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
1962 च्या युद्धात भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे आक्रमण मोडून काढले होते. त्यानंतर लतादीदींनी अवघ्या देशवासियांना साद घालत 27 जानेवारी 1963 रोजी हे गीत गायले. लतादीदींनी गायलेले हे गीत ऐकल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूही रडले होते. हे गीत आजही तमाम भारतीयांना अश्रू ढाळायला लावते व त्यामुळे भारतीयत्व जागे होते. त्यामुळेच ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा याद करो कुर्बानी...’ हे गाणे आजही अक्षय आहे, अजरामर आहे.
मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या 'लोढा फाऊंडेशन'ने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या गाण्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतानाच शहीद जवानांच्या शौर्यालाही सलाम ठोकण्यात येणार आहे. त्यासाठीच आज महालक्ष्मी रेसकोर्सवर लाखो मुंबईकर एकत्र येणार आहेत. पुन्हा एकदा ‘ऐ मेरे वतन के लोगों’चे शब्द घुमणार आहेत. मात्र यानिमित्ताने नरेंद्र मोदी लतादीदींच्या स्वरात सूर मिसळणार आहेत.
या गाण्याबरोबरच शौर्यपदक विजेत्या शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मानही करण्यात येणार असून या कार्यक्रमाला मुंबईकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोढा फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष वसंत बेडेकर यांनी केले आहे.
पुढे वाचा, लतादीदींवर का भडकली होती काँग्रेस...