आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi In Mumbai On December 22, 10000 \'chaiwallas\' To Attend BJP Rally

नरेंद्र मोदींच्या सभेला मुंबईतील 10 हजार चहा विक्रेत्यांना निमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येत्या 22 डिसेंबरला मुंबईत सभा होत आहे. या सभेसाठी मुंबई शहर भाजपने जोरदार तयारी केली आहे. याचबरोबर या सभेला मुंबई शहरातील 10 हजार चहा विक्रेत्यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांना बसण्यासाठी सभामंडपात खास अशी वेगळी जागा करण्यात येत असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी कधी एके काळी चहा विक्रेते होते. मोदी आपल्या वडिलांसमवेत रेल्वेत चहा विक्री करीत होते. त्यामुळे भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर मोदी सर्वसामान्यांच्या भावनेला हात घालण्यासाठी मुंबईतील चहा विक्रेत्यांना सभेला बोलविणार आहेत. मोदी स्वत:ही आपण एक साधे चहा विक्रेते होतो, असे जाहीर सभांतून सांगतात.
चहावाल्यांना निमंत्रण देऊन मोदी व भाजप काय करू इच्छितात, वाचा पुढे...