आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Inaugurated The Installation Ceremony Of The Cornerstone

आंबेडकर स्मारकाला मुहूर्त सापडला, ४ ऑक्‍टोबरला इंदू मिलच्या जागेवर भूमिपूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कोनशिला बसवण्याचा सोहळा येत्या ४ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ४ ऑक्टोबरला पंतप्रधान मुंबईत दोन कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. त्यापैकी एक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कोनशिला आणि बोहरा समाजाचा एक कार्यक्रम आहे. मोदींच्या मंजुरीनंतर अंतिम तारखा जाहीर केल्या जातील. तथापि, सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात ४ तारीख निश्चित करण्यात आली आहे.

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी कोनशिला बसवण्याचा प्रस्ताव होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची मुंबईच्या इंदू मिल परिसरातील १२.५ एकर जागा डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २०१२ मध्ये राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली होती.