आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदी दरबारा’त पवार- जोशींचा अवमान, राज ठाकरेंना निमंत्रणच नाही !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात देश- विदेशातील मान्यवरांना सन्मानाचे स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा मात्र अवमान करण्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू होती. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना तिसर्‍या- चौथ्या रांगेत बसवण्यात आले, तर अभिनेता सलमान खान, अनुपम खेर यांना मात्र दुसर्‍या रांगेत जागा देण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनाही तिसर्‍या रांगेत जागा देण्यात आली होती. त्यांच्या पुढच्या रांगेत भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या मोठय़ा नेत्यांचा योग्य तो मान न राखल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘शरद पवार, चिदंबरम यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना जर तिसर्‍या आणि चौथ्या रांगेत बसवले जात असेल आणि त्यांच्यापुढच्या रांगेत जर सिने अभिनेत्यांना जागा मिळत असेल तर यावरून नव्या सरकारच्या कार्यपद्धतीचा अंदाज काढता येईल. राजशिष्टाचारापेक्षा नव्या सरकारच्या आवडी-निवडीवर ही बैठक व्यवस्था करण्यात आली होती आणि हे सगळं राज्यातली जनता पाहते आहे’, अशा सूचक शब्दांत मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.
मोदींचाच गजर
मोदी यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणावर आयोजित करण्यात आला होता. आजपर्यंतच्या इतिहासात पंतप्रधानांच्या शपथविधीसारख्या उच्चतम सोहळ्यात घोषणाबाजी आणि नारेबाजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र, मोदींच्या आकंठ प्रेमात असलेले भाजपचे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते या शपथविधी सोहळ्यात हजर असल्याने त्यांनी मोदींचे नाव पुकारले जाताच ‘मोदी मोदी’ असा नावाचा गजर सुरू केला होता.

पुढील स्लाइडमध्ये, राज ठाकरेंना निमंत्रणच नाही !