आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदींचा इतिहास कच्‍चाच, महाराष्‍ट्रात 26 नव्‍हे 17 मुख्‍यमंत्री झाले\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातचे मुख्‍यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जाहीर सभेत कॉंग्रेसवर टीका करताना महाराष्‍ट्राचीही खिल्‍ली उडविली होती. मोदींच्‍या टीकेला राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींचे इतिहासाचे ज्ञान कच्‍चेच असल्‍याचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. महाराष्‍ट्रात आतापर्यंत 17 मुख्‍यमंत्री झाले. मोदींनी महाराष्‍ट्रात आतापर्यंत 26 मुख्‍यमंत्री झाल्‍याचा दावा केला होता. त्‍यामुळे मोदींनी पुन्‍हा एकदा इतिहास जाणून घ्‍यावा, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

मलिक म्‍हणाले, 1960 पासून महाराष्‍ट्रात 17 मुख्‍यमंत्री झाले. मोदींनी भाषणात 26 मुख्‍यमंत्री झाल्‍याचा दावा करुन महाराष्‍ट्राच्‍या राजकारणावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले होते. त्‍यामुळे त्‍यांचा इतिहास कच्‍चाच असल्‍याचे मलिक म्‍हणाले.

मोदींचा प्रत्‍येक दावा खोटा... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...