आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यकर्त्यांनो चालते व्हा, असे सांगत केंद्रात आगामी सरकार एनडीएचे असेल आणि त्यासाठी उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार निवडून देऊ, असा दावा महाराष्ट्रातल्या भाजपच्या पदाधिकार्यांनी आज मुंबईत झालेल्या महागर्जना रॅलीत केला. तसेच राज्यात सत्ता दिली तर महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी तर कमी करूच; पण छत्रपती शिवाजी महाराज आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय
दर्जाचे स्मारक बांधण्याचे वचनही या महागर्जना रॅलीच्या निमित्ताने भाजपने दिले. मुंडे यांनी भाषणादरम्यान राज्यात आता सत्ताबदल होणार आणि 14 वर्षांचा वनवास संपणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी काँग्रेसने लोकपालचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, ते श्रेय अण्णा हजारेंचे असल्याचे सांगितले.
आइस्क्रीम विकणारे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, लहानपणी पेपर विकणारे एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होऊ शकतात, तर चहा विकणारे मोदी भारताचे पंतप्रधान का होऊ शकत नाहीत, असा सवालही राजनाथसिंह यांनी काँग्रेसला केला. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आदरार्थी उल्लेख करताच जमलेल्या लोकांनीही त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.