आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi's Programe On Raigad Its Not Good Sachin Sawant

रायगडावर मोदींचा कार्यक्रम हे दुर्दैवच - सचिन सावंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवाजी महाराजांच्या रायगडावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसारख्या व्यक्तीचा कार्यक्रम व्हावा, हे अत्यंत दुर्दैवी आहे,’ अशी टीका कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली.
पाच जानेवारी रोजी रायगडवर मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. त्यावर टीका करताना सावंत म्हणाले की, शिवाजी महाराजांनी दिलेला विचार आणि आणि मोदींचे आचरण अगदीच विरोधाभासी आहे, त्यामुळे रायगडावर मोदींना निमंत्रित करणेच चुकीचे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात परस्त्रीला मातेसमान दर्जा होता. मोदींच्या कार्यकाळात मात्र महिलांवर पाळत ठेवण्यात आल्याची टीकाही सावंत यांनी केली. निरपराध महिलांना भर रस्त्यावर गोळ्या घालून बदनाम केले गेले. अशा मोदींचे रायगडाला पाय लागावेत यासारखे दुर्दैव नसल्याचे सावंत म्हणाले.
शिवाजी महाराजांनी कायम सहिष्णुता जपली. सर्व धर्म-जाती-पातींच्या लोकांना समान न्याय दिला. दुसरीकडे मोदींनी मात्र समाजातील केवळ विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन केले. आयुष्यात नेहमी सत्याचे आचरण करणा-या शिवाजी महाराजांच्या रायगडावर आयुष्यभर खोटारडेपणा करणा-या नरेंद्र मोदींनी पाय ठेवावा, हा महाराष्‍ट्राचा अवमानच
असल्याचे ते म्हणाले.